सातार्याचा कालिदास ‘वसई मॅरेथॉन’चा विजेता
देशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखली जाणारी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन सातार्याच्या कालिदास हिरवेने जिंकली. 2 तास 18 मिनिटे आणि 19 सेकंदांच्या वेळेसह, सातार्याच्या कालिदास हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला.
वसई : देशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखली जाणारी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन सातार्याच्या कालिदास हिरवेने जिंकली. 2 तास 18 मिनिटे आणि 19 सेकंदांच्या वेळेसह, सातार्याच्या कालिदास हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला. हिरवे यांच्या पाच सेकंद मागे त्याचा जवळचा मित्र प्रदीपसिंग चौधरी राहिला. दोन वेळा विजेता, दोनदा उपविजेता आणि कोर्स रेकॉर्डधारक मोहित राठोडने 2:19:06 वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
आपले वैयक्तिक सर्वोत्तम खेळ पाच सेकंदांनी गमावलेले हिरवे यावेळी म्हणाले, मी येथे धावणे अनिश्चित होते आणि वसईतील एका मित्रासोबत मी 42 कि.मी. अंतराचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले होते. परंतु, शेवटच्या क्षणी मी माझा विचार बदलला आणि या स्पर्धेत धावण्याचा निर्णय घेतला. हिरवे यांना बक्षीस म्हणून तीन लाख रुपये मिळाले.