नाट्यपदे आणि अभंगांनी रंगले ऋषिकेश बडवे व निधी घारे यांचे सुरेल गायन
दासनवमी उत्सवामध्ये सध्या सुरू असलेल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड येथील भक्त निवासात दररोज उपस्थित समर्थ भक्तांना श्रवणीय अशी पर्वणीच लाभली आहे.
सातारा : दासनवमी उत्सवामध्ये सध्या सुरू असलेल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड येथील भक्त निवासात दररोज उपस्थित समर्थ भक्तांना श्रवणीय अशी पर्वणीच लाभली आहे.
सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश बडवे आणि निधी घारे यांनी सादर केलेल्या अभंगवाणी आणि विविध सुप्रसिद्ध अशा संगीत नाटकातील नाट्यपदांमुळे समर्थ भक्तांना एक विशेष श्रवणीय अशी पर्वणीच मिळाली .आपल्या कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी ..आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ..या समर्थ रामदासांनी रचलेल्या अभंगावर करत सावता माळी यांनी रचलेल्या ..सुखाचे जे सुख चंद्रभागा तटी ..या पंढरपूरच्या वर्णनात्मक अभंगाचे सुरेल गायन निधी घारे यांनी केले .त्यानंतर.. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा ..सादर होत ..सोहम हर डमरू बाजे.. निधीने अतिशय सुरेख सादर केले.
1882 सालापासून संगीत सौभद्र नाटकातील प्रसिद्ध झालेल्या नाट्यपदांपैकी.. कोण तूच सम सांग मज गुरुराया ..सादर होऊन सध्याच्या सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर यांच्याकडून गायली जाणारी ..नंदाचा मोल खोटा घे ..ही गवळण अतिशय सुरेखपणे निधी घारे यांनी सादर केली. त्यानंतर संगीत मानापमान या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात ऋषिकेश बडवे यांनी गायलेले ..रवी मी ,चंद्र कसा मज मिरवित असे लावीत पिसे.. या गीताचे सादरीकरण केल्यावर अध्यात्मिक दैवत असणाऱ्या पांडुरंगाचे ..पांडुरंग नामी.. हे भक्तीगीत निधीने आळवत या रंगलेल्या गायन कार्यक्रमाची ऋषिकेश बडवे यांच्या ..आगा वैकुंठीच्या राया ..या पदांनी झाली .या कार्यक्रमाचे सुरेल निवेदन विघ्नेश जोशी यांनी केले .तर या कार्यक्रमात संगीत साथ ऑर्गनवर सुशील गद्रे, संवादिनीवर हर्षल काटदरे, उदय गोखले ,अथर्व आठले, गणेश मिस्त्री , हर्डीकर यांनी तबला व पखवाजावर केली या सर्व मान्यवर गायक वादक कलाकारांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे वतीने विलासराव ताम्हणकर व सौ. रसिका ताम्हणकर यांनी केला.यावेळी सज्जनगड समर्थ सेवा मंडळाचे योगेशबुवा रामदासी,कोषाध्यक्ष अरविंदबुवा अभ्यंकर रामदासी, विलासराव ताम्हणकर, रसिकाताई ताम्हणकर, विद्याधरबुवा वैशंपायन ,मुंबई येथील आमोद ताम्हणकर यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सुशील गद्रे व श्रुती भावे यांचा स्वरयात्रा हा आगळावेगळा संगीत कार्यक्रम सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत भक्तनिवास सज्जनगड येथे संपन्न होणार आहे.