विश्वास पाटील हे बंडलबाज लेखक
विश्वास पाटील यांनी आपल्या कादंबरीमधून थापा मारल्या आहेत. अनेक साहित्यिक थापा त्यांनी अशाच पचवल्या आहेत.
सातारा : विश्वास पाटील यांनी आपल्या कादंबरीमधून थापा मारल्या आहेत. अनेक साहित्यिक थापा त्यांनी अशाच पचवल्या आहेत. त्यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे, याचा मी निषेध करतो, असे मत विश्वास पाटील यांचे सख्खे बंधू लेखक सुरेश पाटील यांनी व्यक्त केली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रागतिक साहित्य समितीचे शिवाजी राऊत, चंद्रकांत खंडाईत यांची उपस्थिती होती. सुरेश पाटील म्हणाले, आमच्यात कोणताही भाऊबंदकीचा वाद नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणतीही असुया नाही. मी पाय ओढणारा खेकडाही नाही. मात्र, आम्हाला वारणाकाठचे उंदीर, अशी उपमा देणारे विश्वास पाटील हेच खरे बोगस साहित्यिक आहे. त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी बेजाबदार लिखाण केले आहे. वस्तुस्थितीशी संबंध नसणारे त्यांचे लिखाण आहे. त्यांनी अनेक साहित्यिक थापा मारल्या आहेत. मराठा समाजाच्या मनात शिरण्यासाठी त्यांनी दलितविरोधी वक्तव्य केले होते, त्याचाही मी निषेध करतो.