युजवेंद्र चहल घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत, ‘बिग बॉस 18’मध्ये दिसणार..
भारतीय क्रिकेटपटू, लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काहीच आलेबल नाही, ते लवकरच वेगळे होणार, अशा अनेक चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू, लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काहीच आलेबल नाही, ते लवकरच वेगळे होणार, अशा अनेक चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र या जोडप्याने या अफवांवर अद्याप थेटपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही, पण सोशल मिडीयावरील त्यांच्या क्रिप्टीक पोस्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचदरम्यान आता चहलबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तो लवकरच ‘बिग बॉस 18’ या सलमान खानच्या रिॲलिटी शो मध्ये दिसणार आहे. नुकातच तो या शोच्या सेटवर दिसला होता, ज्याचे काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.
युझवेंद्र चहल ‘बिग बॉस 18’ च्या सेटवर कॅज्युअल लूकमध्ये दिसला होता. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची लूज डेनिम पॅन्टमध्ये तो एकदम मस्त दिसत होता. चहलने पिवळ्या रंगाच्या स्नीकर्सने त्याचा लूक पूर्ण केला. यावेळी त्याच्या हातात बॅकपॅकही दिसली. त्याच्या कारमधून उतरून तो थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेला. समोर आलेल्या फोटग्राफर्सना त्याने काहीही पोझ वगैरे दिली नाही.
घटस्फोटांच्या अफवांदरम्यान काय म्हणाला चहल ?
चहल आणि धनश्री वर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यानंतरच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. त्याचबरोबर धनश्री आणि युजवेंद्रच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बातम्याही समोर येत आहेत. या अफवांवर या जोडप्याने कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु अलीकडेच युझवेंद्र चहलने एक पोस्ट केली होती. युझवेंद्र चहलने घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अनेक पोस्ट केल्या. मात्र चहलने या इंस्टा स्टोरीतून दोघांच्या नात्याबाबत इशारा दिला आहे. चहलने या स्टोरीतून स्वत:ला चांगला खेळाडू, चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला मित्र असं म्हटलं. मात्र चांगला पती असा उल्लेख न केल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच घटस्फोटाच्या चर्चेबाबत चहलने हे खरं असू शकतं आणि नाहीही, असंही नमूद केलं होतं.
धनश्री काय