आजारपणाला कंटाळून वृद्धेची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून वृद्धेने आत्महत्या केल्याची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : आजारपणाला कंटाळून वृद्धेने आत्महत्या केल्याची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आजारपणाला कंटाळून कांताबाई अर्जुन जाधव (वय 80, रा.शाहूपुरी) या वृध्द महिलेने राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 12 सप्टेबर रोजी घडली असून शाहुपुरी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.