मिरज जोड मार्ग प्रकल्पाला मंजूरी, रेल्वे कनेक्टीव्ही वाढणार
रेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णय घेतला आहे.
मिरज : रेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेल्वेच्या प्रवासी आणि मालमत्ता गाड्यांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे कनेक्टीव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढकरण्यासाठी रेल्वे मंत्र्यानी मोठे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या मिरज कॉर्ड ( Miraj Chord Line ) मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासा व्हावा यासाठी या जोड मार्गाची मागणी प्रवाशांकडून होत होती. आता दीर्घकाळापासूनची ही मागणी पूर्ण होणार आहे.