जकातवाडीतील महिला पशुपालकांचा अभ्यास दौरा
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक राजवाडा मार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजने मधून मौजे जकातवाडी येथील महिला पशुपालकांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, या अभ्यास दौरांमध्ये महिला पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक माहिती मिळण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे भेट देण्यात आली.
सातारा : पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक राजवाडा मार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजने मधून मौजे जकातवाडी येथील महिला पशुपालकांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, या अभ्यास दौरांमध्ये महिला पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक माहिती मिळण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे भेट देण्यात आली.
भेटीदरम्यान महाविद्यालयातील डॉ. शेलार
व
डॉ. अर्चना जठार
यांनी मुक्त संचार गोठा पद्धती तसेच शेळी मेंढी पालन याबद्दल माहिती महिला पशुपालकांना दिली. महाविद्यालयातील लाईव्ह स्टॉक प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी या विभागामार्फत विविध दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती बाबत विस्तृत माहिती देण्यात आली. विविध प्रशिक्षणाची माहिती
महिलांना देण्यात आली. अभ्यास दौऱ्याबाबत सर्व महिला पशुपालकांनी समाधान व्यक्त केले.
या अभ्यास दौऱ्या
मध्ये
सौ.
तेजश्री सावंत,
सौ.
रेखा सावंत,
सौ.
सुषमा कदम,
सौ.
स्वाती दळवी, सरपंच
सौ.
अश्विनी दळवी,
सौ.
सरस्वती दळवी, श्रीमती साधना जाधव, सौ. छाया देवकर, सौ राणी काटे सहभागी झाल्या होत्या.