नगराध्यक्ष अमोल मोहिते उद्या पदभार स्वीकारणार
सातारा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते हे आज दि. 26 रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
सातारा : सातारा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते हे आज दि. 26 रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
या पदभार स्वीकृती सोहळ्यास खा. उदयनराजे भोसले तसेच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रम आज दुपारी 4 वाजता, सातारा नगरपालिका कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तसेच सातारा शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख विकास विजय गोसावी यांनी केले आहे.
27 डिसेंबर रोजी प्रशासकीय कारकीर्दीची बरोबर चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या आदल्या दिवशीच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदभार स्वीकारत आहेत. पुढील चार दिवसांमध्ये सर्वसाधारण सभा बोलावली जाणार असून या सभेमध्ये उपनगराध्यक्ष निवड व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.