कोयना धरण परिसरात 2.4 रिश्टर स्केल भूकंप
रविवारी सकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी कोयना धरण परिसरात 2.4 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का झाला.
पाटण : रविवारी सकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी कोयना धरण परिसरात 2.4 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावच्या नैऋत्येला पाच किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
या भूकंपाची खोली सात किलोमीटर असल्याचेही यातून स्पष्ट करण्यात आले आहे. या भूकंपाचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हा भूकंप कोयना, पाटण, पोफळी आदींसह पाटण व चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी जाणवला आहे.