छत्रपतींच्या राजधानीतून मुस्लिम संघटनेची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना स्नेह भेट...
जातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम संघटना जमियत उलेमा खिदमत ए खल्क या सामाजिक संस्था कडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना स्नेह भेट पाठवण्यात आली.
सातारा : जातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम संघटना जमियत उलेमा खिदमत ए खल्क या सामाजिक संस्था कडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना स्नेह भेट पाठवण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अझर मणेर यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील महापुरामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. अनेक गावातील लोक व शेतकरी शेतमजूर आज संकटात सापडले आहेत. शेतजमिनी वाहून गेल्या, घरे कोसळली, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आणि अनेक कुटुंब बेघर झाले आहेत. त्यांना मानवता भावनेतून सहकार्य करण्यासाठी मुस्लिम संघटना पुढाकार घेत आहे. सातारा जिल्ह्यातील जमियत उलमा ए हिंद व खिदमत-ए-खलक संस्था यांनी पुढाकार घेतला.
आज सातारातून भूम-परांडा परिसरातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्याची गाडी सातारा येथून रवाना करण्यात आली. यात अन्नधान्य - तांदूळ, गहू, डाळी, पीठ, तेल, साखर, भाजीपाला, कांदे, बटाटे, कोबी, कारले, टोमॅटो, तयार फूड बिस्कीट, फरसाण, बटर, टोस्ट, फूड पॅकेट्स महिलांचे कपडे, मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे ,ब्लँकेट्स, चादरी, टॉवेल, औषधे सॅनेटरी पॅड, ड्रायपर आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांचा समावेश आहे. तसेच विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या साठी पेन, वह्या आणि पुस्तकांचे संच सुद्धा तयार करून देत शिक्षणाचे महत्व आज अधोरेखित केले आहे. संकटाच्या काळात भुकेल्या पोटाला अन्न, अंगावर ओढण्यासाठी कपडे आणि आजारपणात औषध मिळावे यासाठी ही माणुसकीची भेट पाठविण्यात आली आहे. शैक्षणिक किट बनविल्याने जमियत उलेमा ए हिंद आणि खिदमत ए खलक ने सर्व समाजासमोर कुटुंब उध्वस्त झालेल्यांच्या गरजांमध्ये सुद्धा शिक्षण महत्वाचे आहे. हा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
“सर्वांचे पैगंबर यांनी माणुसकीचा संदेश दिला आहे. धर्म, जात-पात न पाहता संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे हेच खरे इस्लामचे तत्त्व आहे. आज मराठवाड्यातील आपले देशबांधव संकटात आहेत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे, त्यांना आधार देणे हीच खरी पैगंबरांची शिकवण आहे.” आणि हि शिकवण आपण कृतीतून दाखवून नाही दिली तर आपल्याला आय लव्ह मुहम्मद म्हणण्याचा अधिकार नाही. असे सादिक भाई शेख यांनी सांगितले.
सातारकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली ही माणुसकीशी भेट पूरग्रस्तांना थोडासा दिलासा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. तसेच पुढील काही दिवसांत आणखी टप्प्याटप्प्याने साहित्य पाठविण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आज लहान बाळांनी देखील स्वतःच्या बचतीचे पैसे, नवीन कपडे स्त्रियांनी घेतलेले नवीन पोशाख देखील मदतीसाठी पाठविले. स्त्रियांचा सहभाग हा वाखाणण्याजोगा होता. व्यापारी मंडळ, व्यापारी काही अधिकारी सर्व धर्मातील बांधवांनी जमियत आणि खिदमत ए खलकच्या आवाहनाला साथ देत वस्तुरूपी मदत केली.
जमियत उलेमा चे अध्यक्ष मौलाना रियाज व खिदमत ए खलक चे सादिकभाई शेख आणि हाजी मोहसीन बागवान यांच्या मार्गदर्शनामुसार मुफ्ती उबेदुल्लाह आत्तार, मुफ्ती मोहसीन बागवान, अझहर मणेर, हाजी शाकीर बागवान, हाजी सलीम भारत, रझिया अप्पा शेख, अप्पा मुलाणी, असिफ खान, हाजी नदाफ, शाहरुक्ज शेख, असिफ खान, मोहसीन कोरबू, अझहर शेख, सिद्दीक खान, मौलाना अलीम सय्यद, एजाज काझी हाफिज मुराद, अरिफ खान, पिंटूशेठ सुतार, साजिद शेख, असिफ फरास, इस्माईल पठाण तसेच जमियत उलेमा ए हिंद, मुस्लिम मावळा , सैफुल्लाह ग्रुप, व्यापार मंडळ मधील तरुण, महिलांनी सहभाग घेतला.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जमियत उलेमा ए हिंद सातारा ह्यांच्या वतीने विशेष स्कॉलरशिप जाहीर केली असल्याची माहिती जमियत उलेमा चे सातारा जिल्हा सचिव मुफ्ती मोहसीन बागवान यांनी दिली.
सातारकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली ही माणुसकीशी भेट पूरग्रस्तांना थोडासा दिलासा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. तसेच पुढील काही दिवसांत आणखी टप्प्याटप्प्याने साहित्य पाठविण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.आज लहान बाळांनी देखील स्वतःच्या बचतीचे पैसे, नवीन कपडे स्त्रियांनी घेतलेले नवीन पोशाख देखील मदतीसाठी पाठविले. स्त्रियांचा सहभाग हा वाखाणण्याजोगा होता. व्यापारी मंडळ, व्यापारी काही अधिकारी सर्वधर्मतील बांधवांनी जमियत आणि खिदमत ए खलकच्या आवाहनाला साथ देत वस्तुरूपी मदत केली.
जमियत उलेमा चे अध्यक्ष मौलाना रियाज व खिदमत ए खलक चे सादिकभाई शेख आणि हाजी मोहसीन बागवान यांच्या मार्गदर्शनामुसार मुफ्ती उबेदुल्लाह आत्तार, मुफ्ती मोहसीन बागवान, अझहर मणेर, हाजी शाकीर बागवान, हाजी सलीम भारत, रझिया अप्पा शेख, जबीन अप्पा मुलाणी, असिफ खान, हाजी नदाफ, शाहरुक्ज शेख, असिफ खान, मोहसीन कोरबू, अझहर शेख, सिद्दीक खान, मौलाना अलीम सय्यद, एजाज काझी हाफिज मुराद, अरिफ खान, पिंटूशेठ सुतार, साजिद शेख, असिफ फरास, इस्माईल पठाण तसेच जमियत उलेमा ए हिंद, खिदमत ए खलक, मुस्लिम मावळा, सैफुल्लाह ग्रुप, व्यापार मंडळ मधील तरुण, महिलांनी सहभाग घेतला.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जमियत उलेमा ए हिंद सातारा ह्यांच्या वतीने विशेष स्कॉलरशिप जाहीर केली असल्याची माहिती जमियत उलेमा चे सातारा जिल्हा सचिव मुफ्ती मोहसीन बागवान यांनी दिली.