अतुल भिसे यांना न्याय मिळण्यासाठी आरपीआयचे आंदोलन
मातंग समाजाचा युवक अतुल भिसे यांना आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या सर्व व्यक्तींवर तात्काळ योग्य ती कारवाई व्हावी.
सातारा : मातंग समाजाचा युवक अतुल भिसे यांना आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या सर्व व्यक्तींवर तात्काळ योग्य ती कारवाई व्हावी, तसेच संबंधित युवकाच्या कुटूंबियांना प्रशासनाकडून तात्काळ योग्य ती मदत मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी सातारा आरपीआयच्यावतीने सातारा शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याबाबत आरपीआयच्यावतीने प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मातंग समाजाचा युवक अतुल भिले यास आत्महत्त्या करण्यास भाग पाडल्याने त्यातील संबंधित ५ आरोपींना अटक केलेली आहे. तरी, उरलेल्या ३ आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही, त्यांना तात्काळ अटक व्हावी. तसेच मयत अतुल भिसे याच्या आई - वडिलांना समाज कल्याण विभागाकडून तात्काळ ५० लाखाची मदत घोषित करावी, मयताच्या भावास शासकीय नोकरीत घ्यावे, तेसच त्याच्या आई वडिल, भाऊ यांचे पुनर्वसन करण्यात यावे, सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.
विविध प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. १५) डॉ. राजेंद्र गवइ, जकाप्पा कांबळे, चंद्रकांतदादा कांबळे, संजय गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी हा मोर्चा काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी सुहास मोरे, गणेश भिसे, सागर भिसे, सनी काटे, सुंदर ओव्हाळ, दयानंद नागटिळक, गणेश वाघमारे, विशाल कांबळे, रेखा सकटे, सुचित्रा कडाळे, ॲड. पायल गाडे, नलिनी घाडग, राहुल कमाने, विशाल भिसे यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.