सातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायती चे आरक्षण निश्चित
सातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायतीच्या सण २०२५ ते २०३० च्या दरम्यान निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवारी प्रांताधिकारी आशिष बारकुल व तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली.
सातारा : सातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायतीच्या सण २०२५ ते २०३० च्या दरम्यान निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवारी प्रांताधिकारी आशिष बारकुल व तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली.
सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शेंद्रे येथे पार पडली. यावेळी अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी ११ ग्रामपंचायती, अनुसूचित जाती खुला प्रवर्गासाठी ११ ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी १ ग्रामपंचायत, नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी २६ ग्रामपंचायती, नागरिकांचा मागास खुला प्रवर्गासाठी २६ ग्रामपंचायती, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ६१ ग्रामपंचायती, सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी ६१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
सातारा तालुक्यातील आरक्षण सोडत शेंद्रे येथील सभागृहात सातारचे तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आरक्षण सोडत ऐकण्यासाठी त्या त्या गावातील गावपुढारी उपस्थित होते. आरक्षण सोडत ही पूर्वीच्या सरपंच पदाच्या व लोकसंख्या निकषांवर पार पडली. त्यात अनुसूचित जाती महिलासाठी आरगडवाडी, डोळेगाव, चिंचणेर संमत निंब, लिंबाचीवाडी, रेणावळे, पोगरवाडी, टिटवेवाडी, वर्णे, संभाजीनगर, आस्टे 1, अंगापुर तर्फ तारगाव या 11 गावाना लागले, तर अनुसूचित जाती खुला प्रवर्गातील गावे सारखळ, खोजेवाडी, पाडळी, गवडी, कामेरी, कुशी, वासोळे, गणेशवाडी, रामनगर, सोनवडी, ठोसेघर या गावाचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती महिला म्हणून आरळे या गावासाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील वर्णे, ठोसेघर, गवडी, पाडळी यासह गावात सुद्धा ओपन आरक्षण न पडल्याने अनेक इच्छुकांची गोची झाली आहे.
मागास प्रवर्ग महिला आरक्षित ग्रामपंचायती मध्ये दरे बुद्रुक, वर्ये, गजवडी, कोपर्डे, काळोशी, लांडेवाडी, धनवडेवाडी, नांदगाव, गोवे, बोरणे, भाटमरळी, कोडोली, कोंडवे, पेट्री अनावळे, हमदाबाज, आकले, निनाम, धनगरवाडी (कोडोली), धावडशी, जैतापूर, बसाप्पाची वाडी, माळ्याची वाडी, वनगळ, शहापूर, डबेवाडी, जांभगाव यांचा समावेश आहे.
मागास प्रवर्ग खुला आरक्षित ग्रामपंचायतींमध्ये वेणेखोल, क्षेत्र माहुली, नुने, तुकाईचीवाडी, पानमळेवाडी, गोजेगाव, सैदापूर, मालगाव, मर्ढे, उपळी, किडगाव, कारी, केळवली सांडवली, जोतिबाचीवाडी, पळसावडे, भैरवगड, आरे तर्फ परळी, देशमुख नगर, आष्टे (शेळकेवाडी), लुमणेखोल, तासगाव, अंगापूर वंदन, पिंपळवाडी, लावंघर, शेरेवाडी, निगडी वंदन यांचा समावेश आहे.
सर्वसाधारण महिला आरक्षित ग्रामपंचायतींमध्ये वेळे, सायळी पुनर्वसन, अंबवडे खुर्द, बोरगाव, भोंदवडे, शेंद्रे, संगम माहुली, आसनगाव, मत्त्यापूर, निगडी तर्फ सातारा, फडतरवाडी, जिहे, नागेवाडी, निसराळे, फत्त्यापूर, साबळेवाडी, परळी, कारंडवाडी, आटाळी सावली, कण्हेर, जांभळेवाडी, परमाळे, पांगारे, पिलाणी, यवतेश्वर, वावदरे, सासपडे, सोनापूर, जाधववाडी, लिंब, इंगळेवाडी, कुसवडे, कुस बुद्रुक, चाळकेवाडी, चिखली, देवकल पारंबे, नेले, रामकृष्ण नगर, वडगाव, समर्थ नगर, जावळवाडी, पाटखळ, कामथी तर्फ सातारा, आवाडवाडी, अपशिंगे, चोरगेवाडी, जांभे, नित्रळ, मस्करवाडी, रोहोट, राकुसलेवाडी, वेणेगाव, करंडी, खोडद, खडगाव, चिंचणी पु., मापरवाडी, चिंचनेर वंदन, अंबेवाडी, अतीत, चिंचणी यांचा समावेश आहे.
सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील आरक्षित ग्रामपंचायतींमध्ये बोपोशी, कासार स्थळ, सोनगाव संमत निंब, काशीळ, जकातवाडी, वेचले, सोनगाव तर्फ सातारा, आलवडी धावली, खावली, बेंडवाडी, मांडवे, वळसे, शेळकेवाडी, सायळी, राजापुरी, कातवडी बुद्रुक, पाटेघर, महागाव, नागठाणे, आरफळ, कुरुलबाजी, आसगाव, खिंडवाडी, खेड, आंबवडे बुद्रुक, कुमठे, कोंढवली, कोंदणी नरेवाडी, झरेवाडी, धनगरवाडी निगडी, निगुडमाळ, भरतगाव, माजगाव, यादववाडी, शिंदेवाडी, सांबरवाडी, मुदगल भटाची वाडी (शिवाजीनगर), बनघर, न्हाळेवाडी, आगुंडेवाडी, देगाव, कुस खुर्द, गोगावलेवाडी, पाटेश्वर नगर, बोरखळ, विजयनगर, भरतगाववाडी, धोंडेवाडी, करंजे तर्फ परळी, कुरूण, रेवंडे, पिलाणीवाडी, वडूथ, शिवथर, समर्थगाव, वाढे, दरे तर्फ परळी, आंबळे रायघर, मोरेवाडी, कळंबे, म्हसवे आदींचा समावेश आहे.
यावेळी नायब तहसिलदार सुजाता पाटील, वृषाली निंबाळकर, मंडल अधिकारी तोरडमल, हणमंत सानप, तुषार पोळ, गणेश बोबडे, विजय घोडके, अमोल बोबडे उपस्थित होते.