गणेशोत्सवासाठी सातारा जिल्हा पोलीस सज्ज
सातारा जिल्ह्यात श्री गणरायाच्या आगमनाला केवळ 48 तास उरले आहेत. असे असताना सातारा जिल्हा पोलीस बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया रूट मार्च कोंबिंग ऑपरेशन याची तयारी सुरू केली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात श्री गणरायाच्या आगमनाला केवळ 48 तास उरले आहेत. असे असताना सातारा जिल्हा पोलीस बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया रूट मार्च कोंबिंग ऑपरेशन याची तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी रेकॉर्डवरील सहाशे गुन्हेगारांची तडीपारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही हा उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पोलिसांनी अगोदरपासूनच तयारी सुरू ठेवली आहे. समीर शेख यांनी जिल्हास्तरावरील ग्रामीण भागातील सार्वजनिक मंडळाच्या तसेच सातारा शहरातील 156 मंडळाच्या बैठका यापूर्वीच आयोजित करून तशा आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. गर्दीच्या वेळी सोनसाखळी चोरी वाहन चोरी तर होऊ नये घडू नयेत म्हणून सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. या दोन्ही पोलीस स्टेशनचे पाच पथक साध्या वेषांमध्ये त्यांचा वावर राहणार आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांचा अहवाल मागून घेतला असून तब्बल 600 गुन्हेगार पोलिसांच्या रडावर आहेत. त्यांना तडीपारच्या नोटिसा बजावल्या जाऊन गणेशोत्सव काळात त्यांना हद्दपार केले जाणार आहे. त्याकरिता सातारा शहर, शाहूपुरी, सातारा. एमआयडीसी पोलीस चौकी तसेच कार्यक्षेत्रातील बीटचौक्यांना याचे आदेश निर्गमित झाले आहेत. सातारा शहरालगतच्या संवेदनशील क्षेत्र असलेले प्रतापसिंह नगर, सदर बाजार, आकाशवाणी झोपडपट्टी तसेच शहरातील एन्ट्री पॉइंटवर रात्रगस्त आणि नाईट पेट्रोलिंग हे वाढवले जाणार आहे. त्याकरता स्वतंत्र तीस बीट मार्शल नेमण्यात आले आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल 5231 गणेश मंडळे आहेत. त्या तुलनेने सातारा पोलिसांची संख्या ही अडीच हजारापेक्षा जास्त नाही याचा विचार करता दंगा नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, यांच्यासह स्ट्राइकिंग फोर्स व जादा तुकडी बंदोबस्तासाठी मागवली जाणार आहे,
सातारा शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस आणि दहाव्या दिवशी गणेश विसर्जन होते, त्यामुळे शहर व परिसरात उत्सव काळात विसर्जन मिरवणूक काढण्यात येतात. त्या मिरवणुका शांततेत पार पाडण्याकरता विसर्जन मिरवणूक मार्ग आखण्यात आला आहे. त्याकरिता या मार्गासह विसर्जन घाट व तळ्यांवर मोठा बंदोबस्त राहणार आहे. गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना घेण्यासह नियम पाळण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुस्क्या आवडल्या जात असून प्रतिबंधात्मक कारवाई वाढली आहे. तडीपारी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई, रूट मार्च , कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत असून या कारवाया सलग राबवल्या जाणार असल्याचे संकेत समीर शेख यांनी दिले. गणेशोत्सवाला केवळ 48 तास उरले आहेत सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे पोलीस प्रशासनाने ही कंबर कसली आहे. सातारा शहर व जिल्हा हद्दीत बारकाईने लक्ष राहावे यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग तसेच पायी गस्तीवर भर दिला आहे. महत्त्वाच्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी पोलीस पायी फिरत आहेत महिला युवती यांची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया पथक तैनात असून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे 20 पोलीस साध्या वेशात तैनात राहणार आहेत.