सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्व्यक श्री. सुनिल काटकर तात्या आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटले असता त्यांनी या महोत्सवास तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.
सातारा : सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्व्यक श्री. सुनिल काटकर तात्या आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटले असता त्यांनी या महोत्सवास तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.
यापूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांनी शाही दसरा महोत्सवास पर्यटन व जिल्हा नियोजन मधून भरीव निधी देण्याची ग्वाही दिली आहे.या कामी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी मदत केली. आज सुनिल काटकर तात्या यांचेसोबत काका धुमाळ,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. चिन्मय कुलकर्णी,भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप, भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक रविंद्र लाहोटी, प्रवीण कणसे उपस्थित होते.