आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकर ला डॉक्टर मुंडे यांचा मेसेज
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या सोमवारी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात माहिती घेण्यासाठी सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या त्यांनी यासंदर्भात संयुक्त यंत्रणांशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली.
सातारा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या सोमवारी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात माहिती घेण्यासाठी सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या त्यांनी यासंदर्भात संयुक्त यंत्रणांशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली. प्रशांत बनकर या संशयीताला डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मेसेज पाठवला होता अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. या संदर्भात अनेक खुलासे दावे, प्रति दावे होत असून अनेक राजकीय नावे या प्रकरणाच्या संदर्भाने जोडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य महिला माहिती आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथील वैद्यकीय अधीक्षक तसेच रुग्णालय तक्रार निवारण समिती यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी या यंत्रणांशी तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. यानंतर रूपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत काही घटनांवर भाष्य केले.
पत्रकारांशी झालेल्या वार्तालापामध्ये त्या म्हणाल्या तक्रार निवारण समिती आणि पोलीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होते. स्वीट आणि फिट रिपोर्ट उशिरा देणे, उशिरा आलेल्या रुग्णांना चांगली वर्तणूक न देणे असे पोलिसांचे काही आरोप होते, तर ड्युटी संपल्यानंतर मुद्दा रिपोर्ट साठी आग्रह धरणे, रात्री उशिरा पेशंट तपासणीसाठी आणणे असे आरोप वैद्यकीय व्यवस्थापन समितीच्या चर्चेतून पुढे आले. या संदर्भात बदलीची शिफारस करण्यात आली होती, मात्र तीन वेळा बदली होऊ नये डॉक्टर मुंडे यांनी हे बदली नाकारली विशेष नियुक्ती द्वारे त्यांना तिथेच कायम ठेवण्यात आले. पीएसआय बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचे सुसाईड नोट मध्ये म्हणले आहे. या संदर्भात पत्रकारांनी चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या या दृष्टीने पोलीस सीडीआर रिपोर्टच्या माध्यमातून अधिक तपास करत आहेत. ते किती वेळा एकत्र होते याचीही माहिती तांत्रिक विश्लेषणातून घेतली जात आहे. मार्च 2025 नंतर डॉक्टर मुंडे बदने यांच्या संपर्कात नव्हत्या मात्र प्रशांत बनकर यांच्याशी आत्महत्येच्या घटनेपर्यंत संपर्कात होत्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात फोटो काढण्यावरून आणि ते फोटो व्यवस्थित न झाल्याने त्यांच्यात वाद झाले होते. इथून त्या जवळच्या देवळात गेल्या तिथून प्रशांत बनकर यांच्या वडिलांनी त्यांची समजूत घालून त्यांना परत आणले. हॉटेलवर जाण्यापूर्वी डॉक्टर मुंडे यांनी बनकर याला मेसेज केला त्याचा मोबाईल बंद होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचे गेलेले मेसेज या संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड होतील तो पोलीस तपासाचा भाग आहे, रूपाली चाकणकर म्हणाल्या..