कराड तालुक्यात एकाचा खून
कराड तालुक्यात अज्ञाताने एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्या बाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : कराड तालुक्यात अज्ञाताने एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्या बाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी बारा वाजण्याच्या पूर्वी कुसूर ता. कराड येथील सोनार डोहा जवळ असलेल्या संतोष शिवाजी खाडे यांच्या शेतात शिवाजी लक्ष्मण सावंत रा. कुसूर, ता. कराड याचा अज्ञाताने धारदार शस्त्राने पोटावर, गळ्यावर वार करून खून केला आहे. याबाबतची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.