जलमंदिर पॅलेस येथे कराडच्या पोलीस उपाधीक्षक सौ. राजश्री पाटील यांची सदिच्छा भेट
कराडच्या उपाधीक्षक सौ राजश्री पाटील यांनी आज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सातारा : कराडच्या उपाधीक्षक सौ राजश्री पाटील यांनी आज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
कराड येथे राजश्री पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे खासदार उदयनराजे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
या प्रसंगी विविध सामाजिक, प्रशासकीय आणि कायदासुव्यवस्थेशी संबंधित विषयांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये समन्वय राखत कराड तालुका अधिक सुरक्षित आणि सुसंस्कृत बनविण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सौ. पाटील यांच्या कार्यातील तत्परता, शिस्त आणि जनतेशी जुळवून घेण्याची शैली पाहता कराड परिसरात निश्चितच नवीन सकारात्मक बदलांची दिशा दिसेल, असा विश्वास खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी ॲड. विनित पाटील, कुलदीप क्षीरसागर, जवाहर पवार, अमोल मोरे उपस्थित होते.