भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणे अभिमानास्पद
भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमध्ये पदाधिकारी असो वा कार्यकर्ता प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली जाते.
सातारा : भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमध्ये पदाधिकारी असो वा कार्यकर्ता प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली जाते. पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी बरोबरच जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदाला साजेसे काम करून पक्ष अधिक बळकट करावा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी पडणवीस यांच्या विचाराने कार्य करा. भाजपचा कर्यकर्ता म्हणून काम करणे म्हणजे अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या विविध मंडल अध्यक्षांच्या निवडी उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विधानसभा संयोजक अविनाश कदम, जेष्ठ नेते दत्ताजी थोरात, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, विठ्ठल बलशेटवार, सौ. सुवर्णा पाटील, सौ. रंजना रावत, विकास गोसावी, विकल्प शहा यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या निवडीमध्ये सातारा शहर अध्यक्ष (मध्य) अविनाश खर्शीकर, सातारा शहर अध्यक्ष (बाह्य) सौ. वैशाली टंगसाळे, सातारा तालुका (उत्तर) अध्यक्ष महेश गाडे, सातारा तालुका (दक्षिण) अध्यक्ष विजय गुजर, जावली तालुका (पूर्व) अध्यक्ष संदीप परामणे आणि जावली तालुका (पश्चिम) अध्यक्ष म्हणून मारुती चिकणे यांची निवड करण्यात आली. या सर्वांना ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष बळकटीकरणासाठी कार्यरत राहावे तसेच कायम जनतेत राहून पक्षाची ध्येय धोरणे आणि काम जनतेपर्यंत पोहचवण्यास प्राधान्य द्यावे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी नाराज न होता पक्षासाठी काम करावे, योग्य वेळी योग्य व्यक्तीची दखल पक्ष घेत असतो. प्रत्येकाला आगामी काळात वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पदाधिकारी असो वा कार्यकर्ता प्रत्येकानी पक्षाशी निष्ठा ठेवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.