सातारा शहरातील स्मार्ट जलमापकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सातारा शहरातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना आणि पाणी वितरिका यांना स्मार्ट जलमापके बसवली जाणार आहेत. या कामाचा ऑनलाइन शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे. हा कार्यक्रम सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
सातारा : सातारा शहरातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना आणि पाणी वितरिका यांना स्मार्ट जलमापके बसवली जाणार आहेत. या कामाचा ऑनलाइन शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे. हा कार्यक्रम सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
सातारा पालिकेने सातारकरांना विशेष सुविधा देण्यासंदर्भात पावले उचलली आहेत. सातारा शहराला कास तलाव व उरमोडी नदी अर्थात शहापूर उद्भव योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. सातारा शहरासह हद्दवाढीच्या भागात साधारण साडेआठ हजार नळ कनेक्शन आहेत. शहराला पाणीपुरवठा होणार्या पाण्याचे नियमन करणे, त्याचे वॉटर ऑडिट होणे तसेच पाण्याची गळती होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट जलमापके बसवण्याचे नियोजन आहे. नगरोत्थान योजनेअंतर्गत या प्रकल्पाला निधी दिला जात आहे.
या जलमापकांचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे छत्रपती शिवाजी सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. सातारा पालिका पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये पुढचे पाऊल टाकत आहे. पाणीपुरवठ्याचे सुलभीकरण करणे आणि त्यात सुटसुटीतपणा आणणे, हा या प्रणालीचा मूळ उद्देश आहे. सर्व सातारकरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.