साताऱ्यातील पथविक्रेत्यांचा पालिकेतील लोक कल्याण मेळाव्याला प्रतिसाद
सातारा पालिकेच्या वतीने पी एम स्वनिधी मेळाव्याचे आयोजन पालिकेच्या सभागृहात करण्यात आले होते.
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने पी एम स्वनिधी मेळाव्याचे आयोजन पालिकेच्या सभागृहात करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री पदविक्रेता आत्मनिर्भर लोककल्याण मेळाव्यामध्ये सुमारे 100 पदविक्रेत्यांनी सहभाग घेतला बँकेचे रेकॉर्ड चांगले ठेवणे आणि व्यवसायात वित्तीय शिस्त बाळगणे असे मौलिक मार्गदर्शन बँक ऑफ महाराष्ट्र चे अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांनी केले.
यावेळी अभियान समन्वयक नितीराज साबळे, वैशाली मुसळे, प्रणिती सुर्वे, रूपाली गाढवे, मयुरी राजे शिर्के, योगिता कुराडे, कल्याण ढोणे, अर्चना जाधव, उषा कडकोळ, कमल माळी, स्वप्नाली खंदारे, आशा मुळीक तसेच राष्ट्रीय नागरिक अभियानाच्या समूह संसाधन व्यक्ती सेजल साळुंखे इत्यादी उपस्थित होते. गीतांजली यादव शहर अभियान व्यवस्थापक यांनी पथविक्रेत्यांसाठी असणाऱ्या आठ योजनांचे महत्त्व आणि माहिती पदविक्रेत्यांना दिली. शहर अभियान व्यवस्थापक कीर्ती साळुंखे यांनी अभियानाचे फायदे आणि महत्व विशद केले. या समन्वय कार्यक्रमात शंभर पथविक्रेते सहभागी झाले होते. लोककल्याण मेळावा हा 17 सप्टेंबर पासून सुरू झाला आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर व निधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत बँकेकडे दाखल झालेल्या करणारा वित्त सहाय्य करून ते निकाली काढणे प्रलंबित लाभार्थ्यांची डिजिटल ऑन बोर्डिंग करणे पत्रिकेचे सामाजिक आर्थिक प्रोफाइलिंग करून आठ दिवसात येऊन देता लाभ मिळवून देणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नितीन तळपे यांनी हॉकर्स म्हणजेच पथविक्रेत्यांनी सतत ऑनलाईन बँकिंग करून इ केवायसी अपडेट करणे तसेच बँकेचे रेकॉर्ड आणि सिबिल स्कोर चांगला ठेवणे शिवाय व्यवसाय मध्ये वित्तीय बाळगणे याविषयी मार्गदर्शन केले साताऱ्यातील इतर हॉकर्स दिसू सुद्धा अधिक माहितीसाठी सातारा नगरपालिकेच्या शहर अभियान व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नितीन तळपे यांनी होकरच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली तसेच आदरणीय बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारे वित्त त्या वित्तीय कर्जाचे टप्पे कागदपत्रांचे वितरण याविषयी माहिती दिली.