बंजारा लमाण जमातीचा समावेश अनुसूचित जमातीत करावा
तेलंगणा व आंध्र राज्य यांनी बंजारा लमाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही केंद्र सरकारने लमाण, राठोड, बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा.
सातारा : तेलंगणा व आंध्र राज्य यांनी बंजारा लमाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही केंद्र सरकारने लमाण, राठोड, बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा. अशी मागणी सद्गुरू सेवालाल फाउंडेशन सातारा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली, यावेळी नामदेव जाधव, राजू चव्हाण, कृष्णा राठोड, यांची उपस्थिती होती. या निवेदनात नमूद आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. शासन स्तरावर हे गाजर अधिकृतपणे स्वीकारल्याने अमलात आले असल्यामुळे त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील बंजारा लमाण समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करावे. आणि येथील आरक्षणाचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसा प्रस्ताव केंद्र शासनाने पाठवण्यात यावा अशी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी आहे.