50 पैशांचा शेअर पोहोचला 46 रुपयांवर, 25 महिन्यांत गुंतवणूकदार बनले कोट्याधीश
एक मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही दिवसांपासून दररोज अप्पर सर्किट सेट करत आहे, त्यामुळे या शेअरचे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत. शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून चढ-उतार सुरु आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई: एक मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही दिवसांपासून दररोज अप्पर सर्किट सेट करत आहे, त्यामुळे या शेअरचे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत. शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून चढ-उतार सुरु आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मात्र एक मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही दिवसांपासून दररोज अप्पर सर्किट सेट करत आहे, त्यामुळे या शेअरचे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत. 25 महिन्यांपूर्वी हा स्टॉक 50 पैशांपेक्षा स्वस्त होता, मात्र आता तो 46 रुपयांवर पोहोचला आहे.
गुंतवणूकदारांना करोडपती बनवणाऱ्या या शेअरचे नाव ओमॅन्श एंटरप्रायझेस लिमिटेड आहे. आज हा शेअर 2 टक्क्यांनी वाढून 46.06 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने 52 आठवड्यांमधील सर्वोच्च पातळी गाठली आहे. गेल्या 5 दिवसांत या स्टॉकमध्ये 8 लाख रुपये गुंतवले असते, तर ती रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती. म्हणजेच तुम्ही अवघ्या 25 महिन्यांत करोडपती बनला असता.
टीप- हा लेख केवळ माहितीसाठी आहे, शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणताही आर्थिक फटका बसल्यास आम्ही जबाबदार असणार नाही.